खानापूर तालुक्यातील गंदिगवाड गावातील अल्पसंख्यांक पत्तीन सौहार्द सहकारी संघाच्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

खानापूर तालुक्यातील अल्पसंख्यांक पत्तीन सौहार्द सहकारी संघाच्या नूतन अध्यक्षपदी राजा रमीज नासिरुद्दीन बागवान आणि उपाध्यक्षपदी इसाक तिगडी यांची निवड झाली आहे. यानिमित्ताने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सत्कार समारंभानंतर बोलताना अध्यक्ष राजा रमीज नासिरुद्दीन म्हणाले, या संघाची प्रगती पुढील काळात आदर्शवत ठरेल . सहकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व योजना कार्यान्वित करण्यावर आमचा भर असेल.
यावेळी हसीन वकुंद , सादिक मलिकणांवर, हसीनबानू हट्टीहोळी, तम्मण्णा होसमनी, फातिमा मुल्ला, अब्दुलरहमान हैदरअली साहेबखान, सहकारी संचालक वाय ए मुल्ला, सादिक मुनियार, इम्तियाज नागवान, पुंडलिक खातगार आदी उपस्थित होते.