Belagavi

नूतन वचन साहित्य लिहिणारा बसवेश्वरांचा उभारणार पुतळा : लिंगायत समाज प्रमुखांच्या बैठकीत एकमताने निर्णय

Share

बेळगावच्या गोवावेस येथे , विश्वगुरु बसवेश्वरांचा नूतन भव्य पुरातला स्थान करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी सुरु करण्यात आली आहे . काही दिवसातच वचन लिहिणाऱ्या बसवेश्वरांचा पुतळा या सर्कलमध्ये बसवण्यात येणार आहे .

होय , बुधवारी , शिवबसव नगरातील लिंगायत भवनामध्ये लिंगायत प्रमुखांची बैठक  पार पडली . या बैठकीत , गोवावेस  येथील  , लिंगायत धर्माचे संस्थापक , महामानवतावादी बसवेश्वरांचा पुतळा  जुना झाल्याने त्या जागी नवीन पुतळा बसवण्यासंबंधी चर्चा करण्यात आली . हा पुतळा कशा प्रकारचा बसवावा याबद्दल अनेक प्रमुखांनी आपली मते मांडली . अश्वारुढ पुतळा बसवायचा   कि वचन सहित  लिहीतानाचा याबद्दल उपस्थित समजा प्रमुखांनी आपले अभिप्राय दिले .  बहुतांशी प्रमुखांनी वचन साहित्य लिहीत असलेल्या श्री बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी सहमती दर्शवली . त्यामुळे असाच पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला .

या बसवेश्वर पुतळ्याच्या स्थापनेसाठी  आ . अभय पाटील यांनी दोन टप्प्यात  ५० लाख रुपयांची देणगी देण्याचे आश्वासन दिले आहे .  त्याचप्रमाणे माजी जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी पालिकेच्या अनुदानातून  १० लाख रु चे अनुदान मंजूर केले आहेत . या बैठकीला उपस्थित असेलेले केएलईचे अध्यक्ष डॉ . प्रभाकर कोरे यांनी सोलापूर तसेच बंगळूरच्या दोन मूर्तिकारांशी तसेच स्थानिक मूर्तिकारांशी याबद्दल चर्चा करणार असल्याचे सांगितले .  वचन साहित्य लिहिणाऱ्या श्री बसवेश्वरांचा पुतळा स्थापन करण्यासाठी आपण सर्वंजण एकत्र येऊया असे ते म्हणाले .

यावेळी कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी , हुक्केरी हिरेमठाचे  श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी , वीरशैव महासभा  जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद ,  डॉ . एफ व्ही मानवी , रमेश कळसन्नवर ,  सोमनिंग माविनकट्टी , वि के पाटील , सचिन पती ,इरण्णा दयानांवर , ऍड एम जी जिरली , बसवराज जगजंपी , सहित अन्य उपस्थित होते .

Tags:

error: Content is protected !!