बसवण कुडची येथील मोरया स्पोर्ट्स यांच्या वतीने के पि एल कुडची प्रेमियर लीग season-2.या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार व कर्नाटक राज्य भाजपचे उपाध्यक्ष अनिल बेनके होते.या स्पर्धेत गावातील 12संघांनी सहभाग नोंदवीला होता.अंतिम सामणा शिवनेरी इलेव्हण व जी टी एम स्पोर्ट्स यांच्यात झाला. प्रारंभी जी टी एम स्पोर्ट्स ने चार शटकात 45 धावा केल्या होत्या.

धवांचा पाठलाग करत शिवनेरी येलेव्हण या संघाच्या निलेश बेडका यांनी लास्ट बॉल मधे चौकार मारून सामना आपल्या पारड्यात पाडला व विजय मिळवीला. तिसऱ्या क्रमांकासाठी सुनविश स्पोर्ट्स व छत्रपती इलेव्हण यांच्यात सामना खेळविण्यात आला.


छत्रपती संघाने 56धवांचा डोंगर उभारला होता. सुनविश स्पोर्ट्स या संघाने धवांचा पाटलाग करत 57धावा काढून विजय मिळवीला. या स्पर्धेत सामनावीर म्हणून लकी मुचंडीकर,

मालिकावीर व सायकल विजेता कमलेश खंडोचे, उत्कृष्ट फलंदाज नवीन कुडची, उत्कृष्ट गोलंदाज जोतिबा मडीवाळ यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी माजी आमदार अनिल बेनके, समाजसेवक परशराम बेडका,सुधीर भातकांडे, बाबू बेडका, संजू बडिगेर, मल्लाप्पा कोळूचे संघ मालक सतीश बेडका, रामकृष्ण खोलकलेकर, संतोष चौगला, बस्सू चौगला, जोतिबा मुतगेकर गावकरी, क्रिकेट प्रेमी उपस्थित होते

विजेत्या शिवनेरी संघाला चषक व पारितोषक देताना माजी आ. अनिल बेनके, परशराम बेडका, बाबू बेडका, सुधीर भातकांडे,सतीश बेडका, रामकृष्ण खोकलेकर व इतर
