ग्रामपंचायत निवडणुकीत चिक्कोडी-सदलगा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आल्याने ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिल पाटील यांचा, काँग्रेस कार्यकर्त्यांनी गौरव केला.
चिक्कोडी-सदलगा मतदार संघातील 26 ग्रामपंचायतींपैकी 18 ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस समर्थक उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत . या उमेदवारांचा निवडून आणण्यासाठी प्रमुख पात्र असलेले आणि चंदूर ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत निवडणुकीत , १३ पैकी ११ जागा काँग्रेस उमेदवारांना मिळवून देण्यात यशस्वी झालेले तसेच चिक्कोडीतील लागोपाठ 20 वर्षांच्या काळात चंदूर ग्राम पंचायतीच्या विकासासाठी झटणारे ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिल पाटील यांचा, काँग्रेस कार्यकर्त्यांनी गौरव केला.
यानंतर आपली मराठीशी बोलताना अनिल पाटील म्हणाले की, चिक्कोडी -सदलगा विधानसभा मतदार संघात माजी खासदार प्रकाश हुक्केरी तसेच आमदार गणेश हुक्केरी यांनी केलेल्या विकासकामांमुळे यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वाधिक उमेदवार जिंकले आहेत. आणि आम्ही गेली 15 वर्षे चंदूर गावात केलेली विकासकामे आम्हाला फलदायी ठरली आहेत. चंदूर गावच्या विकासासाठी सतत रात्रंदिवस लोकहितासाठी परिश्रम करा. याच कारणाने आम्ही पुन्हा एकदा चंदूर ग्रामपंचायत ताब्यात घेतल्याचे मत अनिल पाटील यांनी व्यक्त केले. |
या कार्यक्रमास पांडुरंग कोळी ,, सुरेश कागवाडे, अनिला वाळके, दादा नरवडे, शंकरा शेंडूर , संतोष गुरुव , मल्लप्पा कमते, सुबोध जोशी, रमेश , तेजगौडा पाटील आणि इतर अनेक उपस्थित होते.