Accident

वेगाचा हव्यास, ट्रिपलसीट; २ सख्खे भाऊ ठार; १ गंभीर 

Share

भरधाव मोटरसायकल दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन कोवळे भाऊ जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात बेळगावखानापूर रस्त्यावर झाडशहापूरजवळ बुधवारी रात्री झाला.

एकाच मोटारसायकलवरून तिघेजण बसून येताना भरधाव वेगामुळे रस्त्यातील दुभाजकाला मोटरसायकल धडकून झालेल्या अपघातात २ भाऊ जागीच ठार झाले. तर १ जण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी रात्री झाडशहापूर गावाजवळील ब्रह्मलिंगं मंदिराजवळ झाला. भरधाव वेगामुळे चालकाचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

२१ वर्षीय शिवानंद कबाडगी आणि त्याचा धाकटा भाऊ १९ वर्षीय कुमार कबाडगी अशी मृत भावांची नावे आहेत.  हे दोघेही मूळचे गोकाक तालुक्यातील शिवापूर कोन्नूरचे रहिवासी आहेत. ते बेळगाव तालुक्यातील मच्छे येथील अशोक आयर्न इंडस्ट्रीजमध्ये कामाला होते. घटनास्थळी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सीपीआय सुनीलकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

 

Tags:

error: Content is protected !!