बेळगाव जिल्हा महिला परिषदेतर्फे बेळगावातील जक्कीनहोंड येथील ऍड. सुनील काकतकर यांच्या कार्यालयात हळदी–कुंकू आणि तिळगुळ वाटप समारंभ पार पडला.

बेळगावातील जक्कीनहोंड येथील ऍड. सुनील काकतकर यांच्या कार्यालयात बेळगाव जिल्हा महिला परिषदेतर्फे हळदी-कुंकू आणि तिळगुळ वाटप समारंभ पार पडला. यावेळी ऍड. सरिता पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्वागतगीतानंतर परिषदेच्या अध्यक्षा माधुरी नेवगिरी यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले.
अनुराधा सुतार यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता सुभेदार यांनी आभार मानले. यावेळी माधुरी जाधव, शुभांगी निकम, पूजा काकतकर, माधुरी सावंत तसेच सरस्वती महिला मंडळ, केदनूर, सिद्धी महिला मंडळ, टिळकवाडी, विश्वकर्मा महिला मंडळ, आदिशक्ती महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या.