Belagavi

जिल्हा क्रीडांगणावर होणाऱ्या जनसेवक संमेलनाच्या तयारीचा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी घेतला आढावा

Share

१७ जानेवारीला  बेळगावमध्ये होणाऱ्या भाजप जनसेवक संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे . केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणार असल्याने , जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी  या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली .

होय , राज्यभरात भाजप पक्षाचे  जनसेवक संमेलन होणार आहे . या जनसेवक संमेलनचा सांगता समारंभ १७ जानेवारीला बेळगावच्या जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला आहे . बुधवारी , जिल्हा क्रीडांगणाला   भेट देऊन , पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी  तिथल्या तयारीचा आढावा घेतला .

यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले कि , जनसेवक संमेलनाच्या समारोप समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी होणार आहेत . या कार्यक्रमाद्वारे  ३ ते ४ लाख लोकांना जोडण्याचा निर्णय घेतला आहे . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , आमच्या पक्षाचे सर्व आमदार , नेते व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत . मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यसह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि नेते यात सहभागी होतील .

जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर , मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करुन , रमेश जारकीहोळी , आधीपेक्षा अधिक गतिमान झाले आहेत .  तिथे प्यूनच्या कामापासून सगळी कामे मला करावी लागत होती पण इथे आमचे कार्यकर्ते  खूप काम करीत आहेत . असे सांगितले .

यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील , मंडळ अध्यक्ष धनजंय जाधव , मुरुगाहेंद्रगौडा पाटील आणि इतर उपस्थित होते .

Tags:

error: Content is protected !!