Belagavi

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ७ जणांना मंत्रिपद : कोणालाही मंत्रिमंडळातून दिला नाही डच्चू : मंत्री रमेश जारकीहोळी

Share

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ७ जणांना स्थान देण्यात आले आहे . कोणाचाही हात सोडणार नाही . एच नागेश यांना देखील मंत्रिपदापासून वंचित ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा अभिप्राय  जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला .

एच नागेश याना मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आले काय , या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना , रमेश जारकीहोळी म्हणाले कि , कोणालाही ड्रॉप केलेले नाही . नागेश याचा मंत्रिमंडळातून वगळण्याचा प्रश्नच येत नाही . मला माहित असलेल्या माहितीप्रमाणे , कोणालाही सोडलेले नाही . एच नागेश यांच्याशी माझे बोलणे झाले आहे . कोणत्याही कारणाने तुम्हाला मंत्रिमंडळातून काढणार नाहीत , तुम्ही घाबरु नका असे सांगितले आहे .

मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पांच्या विरुद्ध एमएलसी एच विश्वनाथ यांनी असमाधान व्यक्त केले आहे यासंबधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना , रमेश जारकीहोळी म्हणाले कि  एच विश्वनाथ वरिष्ठ आहेत .  ते जे काही बोलले ते आशीर्वाद समजून विसरुन जाऊया . कोणतीही कायदेशीर गुंतागुंत नसती तर  एच विश्वनाथ १०० % मंत्री होते .

दरम्यात आपली मित्रपक्षांबद्द बोलताना रमेश जारकीहोळी म्हणाले कि , आमच्या टीममधील आज पाच जणांना मंत्रिपद मिळणार आहे .एच विश्वनाथ , मुनिरत्न , , महेश कुमठल्ली , कलबुर्गी , भागातील प्रभावी नेते हे आमच्यापेक्षा जास्त प्रभावशाली नेते मल्लिकायय गुत्तेदार हे  ते मंत्रिपद मिळवण्यास पात्र आहेत . तसेच वरिष्ठांच्या निर्णयाशी आम्ही बद्ध आहोत . अजून एप्रिल मी महिन्यात तालुका पंचायत , जिल्हा पंचायत , निवडणूक संपल्यानंतर अधिक लोकांना संधी मिळेल असे सांगितले .

बेंगळूर अन बेळगावपुरतेच  मंत्रिमंडळ विस्तारित असल्याचा आरोप रेणुकाचार्यानी केला आहे . याला प्रतिक्रिया देताना रमेश जारकीहोळी म्हणाले कि , हे खरे आहे . हे सार्वत्रिक निवडणुकीनंतर झाले आहे . आणि हे अनिवार्य होते . पुढील काळात सर्व काही ठीक होईल . पुढील काळात , मुख्यमंत्री सर्व काही ठीक करतील असे सांगितले . उमेश कत्ती याना आधी मंत्रिपद मिळायला हवे होते ते आता मिळाले याचा आनंद आहे .

एकंदरीत आज मंत्रिमंडळातून कोणालाही काढून टाकण्यात येणार नाही , पुढील काळात माझ्या मित्रमंडळातील सर्वाना   स्थानमान मिळे असा विश्वास आहे असे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले

Tags:

error: Content is protected !!